सिटी बेल| उरण | विठ्ठल ममताबादे |
गौरवमयी व उत्कृष्ट अशी 38 वर्षाची सेवा पूर्ण करून बेलापूर नवी मुंबई येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरिक्षक जगदीश नारायण भारती सेवानिवृत्त झाले.त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आनंदी हॉटेल उरण मधे मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमप्रसंगी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना उरणचे वैभव शिवाजी पवार-उरण तालुका अध्यक्ष,निलेश कन्हैयालाल गोहिल-आय.टी सेल प्रमुख उरण , अडव्होकेट प्रीती जगदीश भारती(रांजणे)- उरण तालुका अध्यक्ष महिला आघाडी,स्नेहा सचिन गोडे- उरण तालुका उपाध्यक्ष महिला आघाडी आदी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.या सर्वांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश भारती यांना सेवानिवृत्त बद्दल शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार केला.








Be First to Comment