सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
मुंबई पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कर्जत तालुक्यातील 336 गावठाण जागेचा सर्व्हे ड्रोन कॅमे-याच्या सहाय्याने करण्यात येणार आहे, हा सर्व्हे 2 डिसेंबर पासून सुरू होणार आहे अशी माहिती तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिली.

कर्जत तालुक्यातील गावठाण क्षेत्राचा ड्रोन कॅमेरा च्या सहाय्याने सर्व्हे करण्यात येणार असून मालमत्ता पत्रक (प्रॉपर्टी कार्ड ) तयार करण्यात येणार आहे, हे काम सर्व्हे ऑफ इंडिया यांच्यामार्फत महसूल विभाग, मोजणी विभाग, आणि ग्राम विकास विभाग यांच्यामार्फत करण्यात येणार आहे, गावठाणाचा नकाशा मोजणी विभागाकडे उपलब्ध असतो त्यानुसार सर्व्हे करण्यात येणार आहे.








Be First to Comment