सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
कर्जत नगरपरिषदेचे नगरसेवक संकेत भासे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कामांचे भूमिपूजन तर काही कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
कर्जत खालापूर विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या विशेष प्रयत्नातून कर्जत नगरपरिषद हद्दीतील दहिवली प्रभागातील मंजूर झालेल्या अनेक विकास कामांचे भूमिपूजन तर काही कामांचा लोकार्पण सोहळा आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते संपन्न झाला आहे.

कर्जत नगरपालिकेचे नगरसेवक संकेत भासे यांच्या नगरसेवक निधीतून सेवालाल नगर व एकता नगर येथील गल्ली रस्ते काँक्रीटीकरण करणे. या झालेल्या कामाचे लोकार्पण सोहळा तसेच राज्याचे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून व कर्जत – खालापूर विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या विषेश प्रयत्नातून एम एम आर डी ए च्या निधीतून दहिवली प्रभागातील मंजूर कामे एस. व्ही.एस बिल्डिंग ते अजय सुवर्ण च्या घराकडे जाणारा रस्ता, फूडकोड हॉटेल ते पाण्याच्या टाकीकडे जाणारा रस्ता, मुद्रे बु.पथदिवे बसविणे अशा आदी मंजूर विकास कामांचे कर्जत नगर परिषदेचे स्विकृत नगरसेवक संकेत भासे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आमदार महेंद्र थोरवे याच्या हस्ते भूमिपूजन सोहळा हा पार पडला आहे.

या प्रसंगी नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील,तालुका प्रमुख उत्तम कोळंबे,नगरसेवक संकेत भासे,भाई गायकर, प्रसाद थोरवे, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, राहुल डाळिंबकर, बळवंत घुमरे,विवेक दांडेकर, बाबू घारे, पंकज पाटील,अभिषेक सुर्वे, राजेश कणसे, श्रीकांत आगीवले,अरुण देशमुख, नगरसेविका वैशाली मोरे, स्वामींनी मांजरे, गोटीराम गायकवाड, विनायक गायकवाड,अविराज शिंदे,चेतन देशमुख, प्रवीण बिबवे,विशाल राठोड,सचिन राठोड आदी नगरसेवक,पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.








Be First to Comment