नंदुरबार जिल्हयातील शाळेमध्ये मुलांचे विविध पद्धतीने शिक्षकांनी केले स्वागत
सिटी बेल | रामकृष्ण पाटील | नंदुरबार |
कोरोना महामारीमुळे पावणेदोन वर्षापासून बंद असलेल्या पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळा अखेर आज सुरु झाल्या आहेत, पहिला दिवस असल्याने जरी विद्यार्थी संख्या कमी असली तरी विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा आनंद पाहायला मिळतोय.
पालक शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये एकूणच आनंद व्यक्त होत आहे.नंदुरबार जिल्हयातील शाळेमध्ये मुलांचे विविध पद्धतीने शिक्षकांनी स्वागत केले आहे.शिक्षकांमध्ये सुद्धा खूप उत्साह पाहायला मिळाला आहे. शिक्षक सुद्धा शाळेच्या आवारातील पावणेदोन वर्षानंतर विद्यार्थ्यांचा किलबिलाट पाहून भारावून गेले आहेत. शाळा सुरु झाल्या असल्यातरी कोरोना नियमावलीचे काटेकोरपणे पालन होतांना दिसून येत आहे.

“ दिड वर्षानंतर शाळा सुरू झाल्यानंतर लहान बालकांसोबतच आम्हालाही खूप आनंद झालाय, याच दिवसाची आम्ही प्रतीक्षा करत होतो असं म्हणायला काहीच हरकत नाही लहान बालक तर किती अभ्यास करू व कोणते गाणे गाऊ या मजेत आहेत, शाळा सुरू झाल्यामुळे मानसिक समाधान मिळाले ”
अनिल वाघ, मुख्याध्यापक
जि.प.मराठी शाळा विखरण,ता.जि.नंदुरबार








Be First to Comment