कळंबोली येथे शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न
सिटी बेल | कळंबोली | मनोज पाटील |
सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पाली चे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय शि़क्षण महर्षी दादासाहेब लिमये यांच्या ११२ व्या जयंती निमित्त कोकण विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन सुधागड विद्यासंकुल कळंबोली येथील सभागृहात करण्यात आले आहे.
वत्कृत्व स्पर्धेसीठी शिक्षण – ऑनलाईन की ऑफलाईन ,बदलते निसर्ग चक्र ,कोरोना आणि सामाजिक अर्थव्यवस्था ,कर्मयोगी शिक्षणमहर्षी स्व.दादासाहेब लिमये ,आपत्ती व्यवस्थापन एक सामाजिक जबाबदारी हे विषय ठेवण्यात आले होते.या स्पर्धेला कोकण विभागातून चांगला प्रतिसाद लाभला .

या वेळी सुधागड विद्या संकुल कंळोबोली चे प्राचार्य राजेद्र पालवे , उपप्राचार्य बी.डी. कसबे ,उपमुख्याध्यापिका सरोज पाटील स्पर्धेचे परिक्षक प्रा.रणदिवे (एन्.एन्. पालीवाला ज्युनिअर काॅलेज नवीन पनवेल) प्रा.प्रभू (सेंट जोसेफ ज्युनिअर काॅलेज कळंबोली )श्री.मिश्रा (सुधागड विद्या संकुल कळंबोली ) कार्या लय अधीक्षक दत्ता शिंदे ,पर्यवेक्षक व्ही.बी. भद्रशेट्टी,एस्.एन. भोसले,पी.पी. जाधव ,बी.एस.माळी आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक भूमी राजाराम चिबडे-लोकनेते रामशेठ ठाकूर ज्यनियर काॅलेज कामोठे,द्वितीय क्रमांक प्रतिक्षा संजय नरसाळे-सु.ए.सो ज्यनियर काॅलेज कळंबोली तर तृतीय क्रमांक विवेक विलास डुबे-ग.बा.वडेर हायस्कूल व वसंतशेठ गणेशमल ओसवाल ज्यनियर काॅलेज पाली या विद्यार्थांनी मिळविला . यशस्वी विद्यार्थांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले .कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. कौशल्या मोमीनगिरे यांनी केले तर मान्यवरांचे आभार प्रा. कुमूदिनी म्हात्रे यांनी केले.








Be First to Comment