Press "Enter" to skip to content

रायगड जिल्हा परिषद शाळेत पहिले “गोफण” प्रशिक्षण शिबिर

सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |

भारतीय गोफण फेडरेशनच्या माध्यमातून राष्ट्रीय गोफणपटू आणि प्रशिक्षक ओंकार महादेव उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली घागरकोंड येथील रायगड जिल्हा परिषद शाळेमध्ये पहिले गोफण प्रशिक्षण शिबिर पार पडले.

गोफण या खेळाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी फेडेरेशन ने ग्रामीण भागापासून सुरुवात केली आहे. पोलादपूर या अतीदुर्गम ग्रामीण भागातील घागरकोंड शाळेपासून या प्रशिक्षण वर्गाची सुरुवात झाली आहे. शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी देखील आवर्जून या प्रशिक्षण शिबिरात भाग घेतला. 17 वर्षे वयोगटाखालील खेळाडूंचा गट आणि प्रौढगटासाठी वयाची मर्यादा नसल्यामुळे सर्व इच्छूक खेळाडू या स्पर्धेत भाग घेऊ शकतात. हा खेळ सांघिक आणि वैयक्तिकरित्या देखील खेळला जातो. पारंपारिक परंतु क्रीडा क्षेत्रात गोफण नव्याने उदयास आल्यामुळे सर्व स्थरावर याची दखल घेतली जात आहे.

गोफण या ऐतिहासिक वारसा असलेल्या खेळाला आज आंतरराष्ट्रीय क्रिडा प्रकारचा दर्जा मिळाला आहे. शालेय क्रिडा प्रकारात समावेश देखील करून घेण्याचे प्रयत्न फेडरेशनमार्फत सुरू आहेत. लवकरच जिल्हा, राज्य आणि राष्ट्र स्थरीय स्पर्धांचे आयोजन देखील फेडरेशन मार्फत केले जाणार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.