Press "Enter" to skip to content

कर्जत तालुक्यातील 9 ग्रामपंचायतीच्या 15 जागांसाठी पोटनिवडणुका : 21 डिसेंबर रोजी मतदान

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

कर्जत तालुक्यातील 9 ग्रामपंचायतीच्या 15 जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आल्या असून पोट निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून 21 डिसेंबर रोजी मतदान होणार असल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली आहे.               

कर्जत तालुक्यातील हुमगाव-1जागा, वेणगाव -1जागा, भालीवडी-6 जागा, सावळे-2 जागा, माणगाव-1जागा, बीड -1जागा, नांदगाव -1 जागा, दहिवली-1 जागा आणि वदप-1जागा अश्या 9 ग्रामपंचायतीच्या 15 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.

नामनिर्देशनपत्रे मागविण्या व सादर करण्याचा वार मंगळवार दि.30 नोव्हेंबर ते सोमवार दि.6 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11ते दुपारी 3 वाजेपर्यंत, नामनिर्देशन पत्र छाननी मंगळवार दि.7 डिसेंबर रोजी 11 वाजल्या पासून, नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम गुरुवार दि.9 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत, निवडणूक चिन्ह वाटप गुरुवार दि.9 डिसेंबर रोजी दुपारी 3 नंतर, आवश्यक असल्यास मंगळवार दि.21 डिसेंबर रोजी मतदान सकाळी 7-30 वा. पासुन सायंकाळी 5-30 वाजेपर्यंत, मतमोजणी बुधवार दि.22 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने तहसीलदार निश्चित करतील अशी माहितीतहसील कार्यालयातील निवडणूक विभागाचे रवी भारती यांनी दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.