सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
कर्जत मधील सार्वजनिक गणेशोत्सव उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी अशिष गोखले, सचिवपदी मंगेश जोशी तर खजिनदारपदी पंकज शहा यांची निवड झाली आहे.
कर्जत मधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात तसेच कर्जत मध्ये अनेक वर्षापासून रुग्णवाहिका सेवा बजावत आहेत, या मंडळाची कार्यकारिणीची निवड रविवार दि. 29 नोव्हेंबर रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली. सुमारे शंभर सदस्य असलेल्या मंडळाची नऊ सदस्यांची कार्यकारणी आहे, मात्र निवडणुकीसाठी दहा उमेदवार उभे राहिल्याने निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी विलास कुलकर्णी यांच्या देखरेखीखाली पार पाडली.दहा पैकी नऊ सदस्य निवडून आले.
रामराव पाटील, संदीप भोईर, पंकज शहा, अशिष गोखले, मंगेश जोशी, रोनक कोठारी, योगेश लोवंशी, कल्पेश शहा, अमित मराठे हे नऊ सदस्य निवडून आले आहेत त्यांनी आपले पदाधिकारी ठरवले आहेत.








Be First to Comment