खारघर मध्ये खुलेआम रेती उत्खनन ; महसूल अधिकार्यांचे दुर्लक्ष
सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |
खारघर खाडी पात्रातून बेसुमार रेती उपसा केली जात असल्याचे चित्र दिसत असताना महसूल विभागाकडून बेकायदा रेती उत्खननाकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे पर्यावरणप्रेमी नाराजी व्यक्त करीत आहेत.
खारघर सेक्टर-8 लगत असलेल्या खाडीत अनधिकृतपणे रेती उपसा करणार्यावर पंधरा दिवसपापूर्वी पनवेल तहसील कार्यालयाच्या महसूल पथकाने धाड टावून रेती उत्खननसाठी वापरले जाणारे सॅक्सन पंप जागीच तोडून अज्ञात व्यक्तींच्या विरोधात कारवाई केली होती. मात्र आताही दिवसाढवळ्या खारघर खाडीत बोटीद्वारे खुले आम रेती उत्खनन करण्यात येत होते.
खारघर खाडीतील बेसुमार रेती उत्खननामुळे पर्यावरणाला धोका उद्भवत आहे. शिवाय चोरट्या पध्दतीने होणारे रेती उत्खनन धोक्याचे ठरत आहे. खारघर मधील काही पर्यावरण प्रेमींनी खारघर खाडीची पाहणी केली. खुले काम रेती उत्खनन होत असूनही महसूल विभाग अधिकार्यांकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. महसूल विभाग अधिकार्यांच्या सहकार्याशिवाय रेती माफिया खुले काम रेती उत्खनन करण्याचे धाडस करु शकत नाहीत, असे पर्यावरण प्रेमींनी सांगितले.
पनवेल तहसील विभागाकडून खारघर खाडीमध्ये बेकायदा रेती उत्खनन करणार्या व्यक्तींवर कडक कारवाई करुन खारघर मध्ये होणारे रेती उत्खनन बंद करावे, अशी मागणी पर्यावरण अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.








Be First to Comment