Press "Enter" to skip to content

मनसे उलवे तर्फे महिलांना मार्गदर्शन

सिटी बेल | उलवे | विठ्ठल ममताबादे |

महाराष्ट्र नवनिर्माण सेना उलवे शहर जनसंपर्क कार्यालय येथे रायगड जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली उलवे शहरध्यक्ष राहूल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित रायगड महिला जिल्हाध्यक्षा आदीतीताई सोनार यांचा सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून स्नेहल जाधव (मनसे मुंबई) यांची उपस्थिती होती.त्यांनी यावेळी उलवे शहरातील महिला कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.तसेच सदर कार्यक्रमास उलवे शहरातील महिला कार्यकर्त्या मोठ्या संखेने हजर होत्या.

यावेळी सेविका महिला मंडळ उलवे अध्यक्षा सुनिता चि.म्हाञे,नर्मदा कि. मढवी,सुनंदा तु.कोळी,पदुबाई बा.पाटील,मनिषा रा.पाटील, वैशाली म.कोळी,धनश्री सु.कोळी, आऱती.स.पवार,आश्विनी रा.कोळी,नयना प्रे कोळी,सुर्वना भ.कोळी आदी महिला मान्यवर उपस्थित होत्या. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात महिला वर्गांची लक्षणीय उपस्थिती होती. सदर सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.