कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांचे नगसेवकांनी केले अभिनंदन
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
रायगड जिह्यातील क वर्गात समावेश असलेली कर्जत नगरपरिषदेला कचरामुक्त शहर म्हणून 3 स्टार मिळाले होते. देशात स्वच्छता अभियानात पंधरा नंबर मिळाल्या बद्दल दिली येथे नगराध्यक्षा सुवर्णा जोशी आणि मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांना सन्मानित करण्यात आले.आज दि.30 नोव्हेंबर रोजी झालेले सर्वसाधारण सभेत नगरसेवक आणि नगरसेविका यांनी दोघांचे अभिनंदन केले.
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभर स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेत कचरा मुक्त शहर आणि त्यासाठी राबविलेले विशेष उपक्रम याची पाहणी करण्यात येते. यात कर्जत नगर परिषदेने केलेली कामगिरी उल्लेखनीय असल्याने त्याची दखल घेत कचरामुक्त शहर म्हणून 3 स्टारचे नामांकन देण्यात आले होते.
दिल्ली येथील विज्ञान भवन येथे कर्जत शहराला कचरामुक्त शहर म्हणून नगरपरिषद नगराध्यक्षा सुवर्णा जोशी आणि मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील यांना पारितोषिक देवून सन्मानीत करण्यात आले होते, आज नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा होती या सभेमध्ये नगरसेवक आणि नगरसेविका यांनी नगराध्यक्षा सुवर्णा जोशी व डॉ.पंकज पाटील यांना पुष्पगुच्छ देवून त्याचे अभिनंदन केले.








Be First to Comment