Press "Enter" to skip to content

प्रभाकर मोकल यांना २०२१ चा वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार

सिटी बेल | ठाणे |

पनवेल तालुक्यातील सु.ए.सो.पालीचे “आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके माध्यमिक विद्यालय शिरढोण,” या विद्यालयातील सहा. शिक्षक मूळ गाव पेण तालुक्यातील कोपर या गावचे रहिवासी प्रभाकर पांडुरंग मोकल यांना भाजप शिक्षक आघाडी कोकण विभागांतर्गत दिल्या जाणाऱ्या “२०२१ च्या वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्काराने” ठाणे येथे सन्मानित करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी उपासभापती स्वर्गीय वसंत डावखरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार ऍड निरंजन डावखरे यांच्या संकल्पनेने आणि प्रेरणेने व भाजप शिक्षक आघाडीच्या वतीने कोकण विभागांतर्गत सागरी-नागरी व डोंगरी भागातील अर्थात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील तसेच ठाणे जिल्ह्यातील सात महानगरपालिका क्षेत्रातील प्रज्ञावंत, गुणवंत, कौशाल्यवंत, उपक्रमशील, सर्जनशील व प्रयोगशील प्राचार्य, उपप्राचार्य, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक व शिक्षक बंधु-भगिनी त्याचप्रमाणे शिक्षण संस्थाचालक व प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना संस्थाचालक यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गेल्या चार वर्षापासून सन्मानित करण्यात येत आहे.

शिक्षण राष्ट्राचा सर्वांगीण विकासाचा पाया आहे. अशा या ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात त्याग, समर्पण, कर्तृत्व या जाणीवांनी नि:स्पृह व निरलसपणे कार्य करणारे प्रभाकर पांडुरंग मोकल यांनी आपल्या अखंडित २७ वर्षीय शैक्षणिक सेवेत ज्ञानाबरोबरच अध्यापन क्षेत्रात प्रयोगशीलता, उपक्रमशीलता तसेच विद्यार्थ्यांच्या इच्छित ध्येयपूर्तीसाठी केलेली धडपड व भारतीय समाजासाठी आदर्शवत दीपस्तंभासारखे केलेले कार्य विचारात घेऊन प्रभाकर पांडुरंग मोकल यांना ” भाजप शिक्षक आघाडीच्या वतीने दिला जाणारा २०२१ चा वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले आहे.

या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी उपस्थित असणारे प्रमुख समारंभाध्यक्ष म्हणून कपिलजी पाटील (केंद्रीय राज्य मंत्री पंचायत राज समिती भारत सरकार), प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय केळकर, आमदार प्रशांत ठाकूर तसेच कार्यक्रमाचे सर्वेसर्वा निरंजन डावखरे (आमदार कोकण पदवीधर मतदार संघ ), आदी मान्यवरांच्या शुभहस्ते प्रभाकर पांडुरंग मोकल यांना “२०२१ चा वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार” म्हणून स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

प्रभाकर पांडुरंग मोकल यांना “२०२१ चा वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार” देवून त्यांच्या कार्याची दखल घेतल्याने आपल्या कार्याची पोचपावती मिळाल्याचे समाधान व्यक्त केले आहे. परंतु त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची आणखी जबाबदारी वाढल्याचेही मत व्यक्त केले आहे.

प्रभाकर पांडुरंग मोकल यांना यापूर्वीही अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत त्यांमध्ये महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक आघाडी तर्फे दिला जाणारा मानाचा “२०२० चा क्रियाशील शिक्षक कोकणरत्न पुरस्कार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय व अल्पसंख्यांक शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे दिला जाणारा ‘राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार,’ दैनिक ठाणे जीवनदीप वार्ता तर्फे दिल्या जाणाऱ्या “२०२१ च्या राज्यस्तरीय जीवनदीप शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.”

प्रभाकर पांडुरंग मोकल यांना मिळालेल्या २०२१ च्या वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कारामुळे त्यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संस्थेचे अध्यक्ष वसंत ओसवाल, उपाध्यक्ष रवींद्र लिमये, सचिव रवी घोसाळकर व इतर पदाधिकारी,विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. सोनावणे मॅडम तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, स्थानिक शालेय कमिटी अध्यक्ष व सदस्य, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य, तसेच पंचक्रोशितील अनेक मान्यवर व विशेषत: माजी विद्यार्थी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन तर अनेकांनी भ्रमणध्वनी वरून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.