Press "Enter" to skip to content

तळवली दांडवाडी येथील असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |

वडगाव ग्रामपंचायतीचे मा.उपसरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा चिटणीस सुरेश पाटील यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून वडगांव ग्रामपंचायत हद्दीतील तळवली दांडवाडी येथील असंख्य कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा हातात घेवून पक्ष प्रवेश करण्यात आले.या गावातील विकास होत नव्हता,त्याच बरोबर विविध समस्या डोकावर काढत असतांना सुरेश पाटील यांनी ते मार्गी लावण्यात आल्या.

तळवळी दांड वाडी उंच आश्या ठिकाणी वसल्यामुळे पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण होत होती.गेले अनेक वर्ष ही समस्या असल्यामुळे त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात आला नाही .पावसाळा संपला की महिला वर्गांसाठी खूप दुरवरुन पाणी आणावे लागत होते. मात्र सुरेश पाटील यांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावल्यामुळे त्याच बरोबर या ठिकाणी असलेल्या विविध समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन पक्ष प्रवेश करीत असलेल्या कार्यकर्ते यांना दिल्या.

यावेळी मा.ग्रा.पं.सदस्य विष्णू पवार यांच्यासह अनंता हिलम,हरिश्चंद्र वाघे,बाळाराम वाघे,गणेश वाघे,बबन वाघे,प्रभाकर वाघे,शंकर पवार, बबन हिलम,अनंता पवार,प्रकाश जाधव,भरत पवार,अंकुश वाघे,दिपक पवार, रोशन जाधव,हरेश जाधव दिलीप पवार,कैलास पवार,दत्ता वाघे,मोहन हिलम,संजय वाघे,लक्ष्मण वाघे,सदा वाघे अशा असंख्य कार्यकर्त्यांनी आज तळवली येथील वडगाव ग्रामपंचायतीचे मा.सरपंच ज्ञानेश्वर मालकर यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहिर प्रवेश केला.

या पक्ष प्रवेश सोहळ्याप्रसंगी वडगाव ग्रामपंचायतीचे मा.उपसरपंच तथा जिल्हा चिटणीस सुरेश पाटील, मा.सरपंच ज्ञानेश्वर मालकर,संतोष ठोंबरे,मा.उपसरपंच सुनिल बडेकर,मा.ग्रा.पं.सदस्य पद्माकर पाटील, उमेश ठोंबरे,विद्यमान सदस्य नंदकुमार पाटील, हरेश पाटील, प्रकाश पवार,जेष्ठ नेते सखाराम ठोंबरे,पांडुरंग मालकर,नंदकुमार जांभुळकर,गणेश पाटील,सी.एम.मालकर, प्रकाश मालकर,बबन गडगे,लहू घोंगे,दिलीप जाधव,सोपान मालकर,संजय मालकर, संतोष तुपे,नरेंद्र मालकर,आदी मान्यवर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.