Press "Enter" to skip to content

शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी केले वृद्धाश्रमाचे उद्घाटन

गिरिजा वेलफेअर असोसिएशन यांच्या माध्यमातून खारघर येथे वृध्दाश्रम

सिटी बेल | खारघर |

आज रविवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२१ रोजी गिरिजा वेलफेअर असोसिएशन यांच्या माध्यमातून खारघर सेक्टर १२ येथे उभारण्यात आलेल्या वृद्धाश्रमाचे उद्दघाटन शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी वृद्धाश्रमातील वृद्धांची भेट घेतली व आपुलकीने विचारपूस केली तसेच गिरिजा वेलफेअर असोसिएशनचे संचालक यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

यावेळी गिरिजा वेलफेअर असोसिएशन संचालक वसंत गुंजर, शिवसेना पनवेल विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकुर, शाखा प्रमुख रोशन पाटील अन्य पदाधिकारी व गिरिजा वेलफेअर असोसिएशन चे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.