Press "Enter" to skip to content

शासनाच्या सकारात्मक चर्चेअंती एसटी कामगार संघटनेची कामगारांना हाक

रायगड जिल्ह्यातील पेण, रोहा, श्रीवर्धन, महाड, माणगाव डेपोतील एसटी कर्मचारी कामावर परतले

सिटी बेल | पेण | वार्ताहर |

महाराष्ट्रातील एसटी कामगारांनी विविध मागण्यासाठी तसेच एसटीच्या विलिनीकरणाच्या मुद्यांवर केलेल्या आंदोलनात मागच्या १८ दिवसांपासून एसटीची लालपरी डेपोतच थांबली असल्याने अनेक प्रवाशांना याचा फटका बसत असल्याने राज्य शासनाने सदर मागण्या मान्य करीत कामगारांनी कामावर हजर राहावे व विलिनीकरणाचा मुद्दा हा न्यायप्रविष्ट आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांनी तात्काळ कामावर हजर राहावे असे आवाहन करून दि.२६ नोव्हेंबर रोजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या समवेत एसटी राज्य कृती समितीची बैठक घेण्यात आली त्या बैठकीत झालेल्या चर्चेअंती सरकारने काही मागण्या मान्य केल्या असल्याने कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे असे आवाहन एसटी कामगार संघटनेच्या माध्यमातून केल्याने आज १९ व्या दिवशी रायगड जिल्ह्यातील पेण, महाड, माणगाव, रोहा, श्रीवर्धन या डेपोतील कर्मचारी काही अंशी हजर झाले असून या पाच डेपोमधील लालपरी प्रवाशांसाठी रस्त्यावर धावली आहे.

रायगडच्या आठ डेपो पैकीं पेण आणि महाड येथील एस दोन दिवस अगोदर धावली असल्याने अनेक विद्यार्थी, प्रवाशी, कामगार वर्गांला आनंद झाला.महाराष्ट्रातील असंख्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता, घरभत्ता, दिवाळी उचल यासह एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे या मागण्यासाठी आंदोलन सुरू असून कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखों प्रवाशी वर्गांचे हाल होत आहे.यामुळे राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्या
जवळपास मान्य करीत विलिनीकरणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याने या संपामुळे राज्यातील विद्यार्थी, कामगार, शेतकरी, व्यापारी यांच्यासह अनेक प्रवाशांचे हाल झाले असून प्रवाशांना जास्त भाडे आकारत खाजगी वाहनांमधून प्रवास करावा लागत आहेे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहावे असे आदेश दिले आहेत नुकत्याच झालेल्या कृती समितीच्या बैठकीत राज्य शासनाच्या सकारात्मक भूमिकेला एसटी कामगार संघटनेने प्रतिसाद देत कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहण्यासाठी आवाहन केले असता जिल्ह्यातील पाच डेपोमधील एसटी कर्मचारी कामावर हजर राहिल्याने प्रवाशांनासाठी एसटी सज्ज झाली आहे.

परिवहन मंत्री अनिल परब आणि राज्य कृती समिती यांच्यात बैठक झाली त्यात मागण्यांमध्ये काही त्रुटी आढळत होत्या त्या चर्चेअंती दुर करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद सरकारने दिला असून विलिनीकरणाचा मुद्दा न्यायालयात आहे कृती समिती जो अहवाल देईल त्याला धरून सरकार योग्य निर्णय देणार असल्याने शासनाच्या या प्रतिसादानंतर कृती समितीने कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

एस.टी. खोपडे – विभागीय अध्यक्ष एसटी कामगार संघटना

सरकार आणि एसटीची कृती समिती यांच्यात सकारात्मक निर्णय झाले आहेत त्यामुळे रायगड जिल्ह्यातील पाच डेपोमधील जवळपास ६०० ते ७०० कर्मचारी तर माणगाव डेपोमध्ये ७० ते ८० टक्के कर्मचारी हजर झाले आहेत २४ सेवा समाप्ती कर्मचाऱ्यांना नोटीसा देण्यात आल्या आहेत त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार आता कमी करुन अधिकाधिक कामगारांनी कामावर हजर राहावे.अन्यथा सोमवार पासून अधिक कडक कारवाई करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अनघा बारटक्के – नियंत्रक एसटी महामंडळ रायगड

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.