Press "Enter" to skip to content

हरीयाणा येथे पार पडली 26 वी राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा

कु.स्नेहल शत्रुघ्न माळी हिने राष्ट्रीय सायकलिस्टमध्ये पटकाविले सुवर्णपदक

सिटी बेल | पनवेल | संजय कदम |

दि 25 ते 29 नोव्हें 2021अशी 26 वी राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा करूक्षेत्र हरीयाणा येथे सुरू असुन यात भारतभरातून प्रत्येक राज्याचे विजेते सहभागी झाले असुन त्यात महाराष्ट्र कडुन नवी मुंबई ची स्नेहल शत्रुघ्न माळी हिने सबज्युनिअर गटात 30 घा अटीतटीच्या स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवत सुवर्ण पदक मिळवले असुन प्रथमच महाराष्ट्राला हे पदक मिळाले आहे .

सदरच्या स्पर्धेत भारत भरातून 42 स्पर्धक सहभागी झाले होते त्यात,अनेक राष्ट्रीय स्तरावरील सायकलिंग क्लब चे राज्यस्तरीय विजेते हे त्याचे राज्यातून विजेते हे सहभागी झाले होते.

करूक्षेत्र येथील या स्पर्धेत रेकॉर्ड करीत स्नेहल शत्रुघ्न माळी रा खारघर हिने सोनी स्पिंग क्लब चे आंतरराष्ट्रीय सायकलिस्ट राजेंद्र सोनी यांचे मार्गदर्शनाखाली सुवर्ण पदक महाराष्ट्राला मिळून दिले आहे येणारे काळात स्नेहल ही भारताकडुन आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायकलिंग स्पर्धेत भारताच प्रतिनिधित्व करणार आहे.

More from क्रिडाविश्वMore posts in क्रिडाविश्व »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.