Press "Enter" to skip to content

मालसई ग्रा.पंचायतीकडून अपंग बांधवांना मदतीचा हात

सिटी बेल | रोहा | शरद जाधव |

रोहे तालुक्यातील मालसई ग्रा.पंचायतीच्या वतीने ग्रा. पं.हद्दीतील अपंग बांधवांना फँनचे वाटप करून मदतीचा हात देण्यात आला आहे.
      

मालसई ग्रा.प़.कार्यालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी सरपंच रसिका मालुसरे, उपसरपंच योगेश शिंदे,सदस्य कुमार कोल्हटकर,दिनेश कराळे,सरिता गायकर, अस्मिता मानकर,मयुरी तुपकर,कविता शेळके, निलेश मालुसरे,पुजा गायकर, संजय मालुसरे, तंटामुक्त समिती अध्यक्ष घन:श्याम कराळे,ओम साईराम अपंग कल्याणकारी संघटना अध्यक्ष मारुती तुपकर व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रा.पंचायतीचे १५ वित्त आयोगाच्या ५ % निधीतून अपंग बांधवांना सदर फँनचे वाटप करण्यात आले आहे.या ग्रा. पं.हद्दीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माध्यमातून विविध प्रकारच्या विकास कामांचा धडाका सुरू असून विविध विकास कामे मार्गी लागली आहेत. तर दरवर्षी या ग्रा. पंचायतीचे माध्यमातून अपंग बांधवांना विविध प्रकारच्या वस्तुंचे वाटप करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर तालुक्यातील अन्य ग्रा.पंचायतींनी देखील अपंग बांधवांना विविध प्रकारच्या माध्यमातून दिलासा मिळवून द्यावा अशाप्रकारचे मनोगत मारूती तुपकर यांनी यावेळी व्यक्त केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.