सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |
माणुसकी प्रतिष्ठान, रायगड जिल्हा परिषद, रोटरी क्लब, तसेच एस ओ एस (SOS) बालग्राम सोगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सोगाव येथे 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला.

या वेळी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करणेत आले.कार्यक्रमात माणुसकी प्रतिष्ठान कार्यकारी कायदे सल्लागार एडवोकेट भूषण जंजिरकर यांनी संविधान दिना बद्दल माहिती दिली. प्रमुख अतिथी रायगड जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे यांनी सर्व विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत संविधान म्हणजे काय व नागरिकांचे अधिकार काय आहेत त्याचा वापर कसा केला पाहिजे या बद्दल माहिती दिली.

या कार्यक्रमाचे सूत्र संचालन माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ श्री राजाराम हुलवान यांनी केले, sos बालग्राम कडून शिवरुद्र लुपणे यांनी रोपे देऊन सर्वांचे स्वागत केले, रोटरी क्लब कडून श्री दिलीप भड व टीम, माणुसकी कार्याध्यक्ष तानाजी आगलावे, सुधाकर निषाद व माणुसकी टीम उपस्थित होते, रायगड जिल्हा समन्वयक जयवंत गायकवाड यांनी कार्यक्रमाचा समारोप करत सर्वांचे आभार मानले.









Be First to Comment