Press "Enter" to skip to content

कर्जत नगरपरिषद कार्यालयात संविधान प्रास्ताविका सामुहीक वाचन

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

संविधान दिनानिमित्त कर्जत नगरपरिषद कार्यालयात संविधान प्रास्ताविकेचे सामुहीक वाचन करण्यात आले.

आज दि. 26 नोव्हेंबर रोजी सकाळी नगरपरिषद कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.त्यानंतर संविधान प्रास्ताविकेचे सामुईक वाचन करण्यात आले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, बांधकाम सभापती स्वामिनी मांजरे, पाणीपुरवठा सभापती राहुल डाळिंबकर, समाज कल्याण सभापती वैशाली मोरे, विरोधी पक्ष नेते शरद लाड, नगरसेवक विवेक दांडेकर, बळवंत घुमरे, नगरसेविका विशाखा जिनगरे, प्राची डेरवणकर, सुवर्णा निलधे,मधुरा चंदन, पुष्पा दगडे,भारती पालकर तसेच नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते

26/11 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.