सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |
ग्रूप ग्राम पंचायत टेंभरी ही जरी लहान असली तरी सुद्धा विकास कामे करण्यासाठी कोणत्याही प्रकारची तडजोड करीत नाही.ग्रामस्थांच्या समस्या,अमलात घेवून त्यावर उपाय योजना राबविण्याचे काम येथिल विद्यमान सरपंच दिलीप ठोंबरे, सातत्याने प्रयत्न करीत आहे.ग्राम पंचायत सरपंच पदाचा कार्यभार सांभाळत असतांना गावाचा विकास होण्याठी सातत्याने अग्रेसर असतात.कोपरी आणी आसरोटी या गावातील असलेल्या रस्त्याचे कॉंक्रेटीकर करण्यात आले.

कोपरी आणी असरोटी या गावातील रस्ता जनसुविधा या योजने अंतर्गत जवळ सव्वा दोनशे मिटर कॉंक्रेटीकर करण्यात आले.गावातील असलेले रस्ता खराब झाल्यामुळें येथिल ग्रामस्थांना खूप समस्या निर्माण होत असल्यामुळे, आमदार महेश बालदि आणी बीजेपी तालुका अध्यक्ष रामदास ठोंबरे यांच्या प्रयत्नांने हा रस्ता बनविण्यात आला.सरपंच दिलीप ठोंबरे ,ग्रामसेवक – गोकुळदास राठोर,उप सरपंच – सुरेखा पाटील गावातील विकास कामे करण्यासाठी सातत्याने भर देत असल्याचे पहावयास मिळत आहे.








Be First to Comment