सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
26/11 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या स्मरणार्थ कर्जत मध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. 114 रक्तदात्यांनी रक्तदान करून शहिदांना आदरांजली वाहिली आहे.
कर्जत पोलीस ठाणे आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 26 /11 शहीद दिनाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली, कर्जत पोलिस ठाण्याच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन संकल्प ब्लड बँकेचे डॉ.राजशेखर नायर व कर्जत पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस नाईक दीपा खडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कर्जत पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की, सार्वजनिक रक्तदाते राजाभाऊ कोठारी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष हंगामी अध्यक्ष संदीप भोईर आदी उपस्थित होते.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सदस्य अभिजित मराठे यांनी सर्वप्रथम रक्तदान करून रक्तदान शिबिराचा शुभारंभ केला. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या मीना प्रभावळकर, पोलीस हवालदार संदेश सानप, प्रशांत देशमुख, महिला पोलीस हवालदार संजिता सानप, बाबासाहेब जाधव, संदीप माळी, शैलेश कदम, हर्षल जमदाडे, जयवंत कोळी, नरेश नांदगावकर, महेश ठाकूर, गणेश बोराडे उपस्थित होते.
कल्याण येथील संकल्प ब्लड बँकेचे डॉ. राजशेखर नायर, सोनाली देसाई,ज्योती मिस्त्री, श्वेता ठाकूर, पल्लवी खैरनार, त्रिवेणी खंडागळे, सुदर्शन आरेकर, धिरज नवले आदींनी रक्त संकलाचे काम केले, त्यांना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या संदीप भोईर, सदानंद जोशी, पंकज शहा, अभिजीत मराठे, विवेक भागवत, भालचंद्र जोशी, कल्पेश शहा, निलेश परदेशी, पंकज शहा, मिलिंद खंडागळे,अनिल शहा, राजेश कोठारी यांनी सहकार्य केले.
सार्वजनिक रक्तदाता राजाभाऊ कोठारी यांनी आपले शंभरावे रक्तदान केले त्याबद्दल पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी त्याचा सत्कार केला. रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान केला. बॉम्बे इंटेलिजन सिक्युरिटी इंडिया लिमिटेड आंबिवली येथील जवानांनी उत्तम प्रतिसाद दिला तसेच पोलीस अधिकारी, कर्मचारी, नागरिक यांनीही रक्तदान करून शहीद जवानांना आदरांजली वाहिली.








Be First to Comment