Press "Enter" to skip to content

माथेरानच्या मुख्याधिकारी सुरेखा भगणे यांची निवड

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ रायगड जिल्हा महिला दुर्गा मंच सरचिटणीस पदी निवड

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ रायगड जिल्हा महिला दुर्गा मंच कार्यकारीणी नुकतीच जाहिर झाली, या मध्ये माथेरानच्या मुख्याधिकारी सुरेखा भगणे यांची सरचिटणीस पदी निवड झाली आहे.

रायगड जिल्हातिल विविध शासकीय कार्यालतिल राज्यपत्रित वर्ग एक व दोन च्या अधिकारांची ओळख तसेच महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंग जिल्हा समन्वय समितीचे पुनर्गठण या संदर्भातील महत्वाची बैठक सोमवार दि. 22 नोव्हेंबर 2021रोजी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग.दि.कुलथे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात संपन्न झाली.

या वेळी माथेरान च्या मुख्याधिकारी सुरेखा भगणे यांची सरचिटणीस पदी एक मताने निवड करण्यात आली, त्याच्या झालेल्या निवडीने अनेकांनी त्याचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी याआधी खालापुर च्या मुख्याधिकारी असताना उल्लेखनीय कामगिरी करून आपल्या कामाचा ठसा ऊमटवला होता.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.