Press "Enter" to skip to content

आदर्श युवा संघटना गडब कार्यालयाचे उद्घाटन

सिटी बेल | पेण | वार्ताहर |

पेण तालुक्यातील गडब येथील गेली 32 वर्ष सामाजिक कार्यात अग्रेसर आसणा-या आदर्श युवा संघटना गडब कार्यालयाचे व वाचनालयाचे उद्घाटन जेएसडब्लु कंपनीचे जनसंर्पक विभागाचे प्रमुख कॅप्टन राजेश कुमार राॅय यांचे हस्ते करण्यात आले.

मुंबई – गोवा महामार्गाचे रुंदीकरणात येथील संघटनेचे कार्यालय तोडण्यात आले होते. जेएसडब्लु कंपनीच्या सीएसआर च्या माध्यमातुन येथील कार्यालय व वाचनालय नव्याने बांधण्यात आले. यावेळी जेएसडब्लु कंपनीचे जनसंर्पक विभागाचे नारायण बोलबंडा, आत्माराम बेटकेकर, जेएसडब्लु कंपणीचे सीएसआर विभाग प्रमुख विनायक दळवी, किरण म्हात्रे, सरपंच अर्पणा कोठेकर, उपसरपंच लक्ष्मण कोठेकर,माजी उपसपंच तुलशिदास कोठेकर, विजय पाटील, आदर्श युवा संघटनेचे संचालक के.पी. पाटील, अध्यक्ष काशिनाथ म्हात्रे, कार्याध्यक्ष दिलिप म्हात्रे,सचिव कमलेश ठाकुर, परशुराम मोकल,आदिसह ग्रामपंचायतीचे सदस्य , संघटनेचे सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते.येथील तरुणांसाठी स्पर्धा परिषासाठी जेएसडब्लु कंपणीच्या माध्यमातुन जी मदत लागेल, ज्या सुविधा लागतिल त्या साठी मदत करणार. आपण समाजासाठी काम केले पाहीजे, स्वामी विवेकांनंदाची महती मोठी आहे, त्याचा आदर्श तरुणांनी घेतला पाहीजे. मेहनतीने मोठे व्हा असे जेएसडब्लु कंपणीचे जनसंर्पक विभागाचे प्रमुख कॅप्टन राजेश कुमार राॅय यांनी या वेळी सांगितले.

आदर्श युवा संघटनेचे कार्य उल्लेखनिय असुन संघटनेला सर्वोतोपरी सहकार्य करणार असे जेएसडब्लु कंपणीचे जनसर्पक विभागाचे आत्माराम बेटकेकर यांनी या वेळी सांगितले तर यावेळी विनायक दळवी, के.पी. पाटील काशिनाथ म्हात्रे, संजय चवरकर आदींनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.