शिक्षणामुळे आपल्या मध्ये सुधारणा होते — विक्रम देशमुख
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
प्रत्येकाने आपला मुलगा किंवा मुलगी असेल त्यांना शिकवलं पाहिजे,शिक्षणामुळे आपल्या मध्ये सुधारणा होते असे मार्गदर्शन कर्जत चे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी केले.
उमरोली ग्रामपंचायत हद्दीतील आषणे वाडी मध्ये तहसीलदार विक्रम देशमुख यांनी भेट दिली. याप्रसंगी कर्जत पोलिस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की, सामाजिक कार्यकर्त्या मोनिका बडेकर, उद्योजक निलेश बडेकर उपस्थित होते.
तहसीलदार विक्रम देशमुख यांनी वाड्यातील समस्यां जाणून घेतल्या, त्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले आदिवासी पाड्यांमध्ये फक्त स्त्री काम करताना दिसते, पुरुष व्यक्ती आहेत ते काय करतात एकच नशा करतात किंवा पत्ते खेळत असतात आणि घरी मोबाईल आहे त्याच्या वरती गाणे ऐकतात किंवा पब्जी गेम खेळत असतात माझी सगळ्यांना एक विनंती आहे की तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, मुलांना शिक्षण द्या प्रत्येकाच्या आयुष्यात बदल होत असेल तर तो बदल शिक्षणानेच होतो असे सांगितले.

प्रत्येकाने आपला मुलगा किंवा मुलगी असेल त्यांना शिकवलं पाहिजे, शिक्षणामुळे आपल्या मध्ये सुधारणा होते. उदाहरणार्थ एखाद्या कुटुंबात मध्ये एखादा व्यक्ती नोकरीला लागली तर त्यांचे राहणीमान बदलते, तूमच्याकडे माझा नंबर ठेवा मी तुम्हाला मदत करेन कोणाला एमपीएससी करायचे असेल तर कोणाला पोलीस मध्ये भरती व्हायचं असेल किंवा कोणाला सैन्य मध्ये भरती व्हा त्यासाठी मी मदत करेन असे सांगून स्वच्छ होण्यासाठी फक्त पाण्याची गरज आहे, व्यसन करू नका व्यसन सोडून द्या स्वच्छतेला लागा मुलांना शिक्षण द्या, मोबाईल चे व्यसन सोडून द्या, लसीकरण करा, पहिला डोस ज्यांनी घेतला नाही त्यांनी पहिला डोस घ्या, पहिला डोस घेवून 84 दिवस संपले त्यांनी दुसरा डोस घ्या असे सांगितले.
भारतातलं सौंदर्य आहे किंवा खरी बुद्धिमत्ता आहे ती छोटे छोटे गावा मध्ये आहे मात्र गावातली लोक फक्त मोबाईल कडे वळली आहे मोबाईल पासून कृपया सगळ्यांनी दूर राहा, आई या शब्दातच खूप मोठी पावर आहे, आई मुलांना शिकवू शकते तिला कितीही त्रास होत असेल तरी मुलांना शिकवण्याची ऊर्जा तिच्या मध्ये आहे आयुष्यामध्ये आपण ठरवलेली गोष्ट साध्य करू शकतो असे सांगून संजय गांधी योजना,श्रावण बाळ, निराधार महिला कॅन्सर रुग्ण यासाठी शासनाच्या योजनांच्या माहिती दिली, तसेच 18 वर्ष वय पूर्ण झालेल्या मुले मुली नी मतदार नोंदणी करावी असे सांगितले.

वाडीमध्ये बारावी किंवा त्या पेक्षा जास्त शिक्षण घेतलेल्या विजय भालचंद्र सांबरी, महेंद्र गणू सांबरी आणि राजेश महादू सांबरी या तीन मुलांचा तहसीलदार विक्रम देशमुख यांनी पुष्पगुच्छ देवून सत्कार केला नुसते शिक्षण घेवून घरी बसू नका पुढे शिका किंवा नोकरी साठी प्रयत्न करा त्यासाठी मी मदत करेन असे त्यांनी सांगितले.
यावेळी गावातील एक अपंग मुलगी काजल रामदास पाचअंगे वय 6 वर्ष हिला तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दत्तक घेतली आहे त्याच्या उपचाराचा खर्च ते करणार आहेत.








Be First to Comment