खोपोलीत झालेल्या शिवसेनेच्या जाहीर मेळाव्यानंतर शहर प्रमुख सुनील पाटील यांना नवीन उभारी
सिटी बेल | खालापूर | विकी भालेराव |
खोपोली येथे झालेल्या कर्जत-खालापूर च्या शिवसेना जाहीर मेळाव्यात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी खोपोली चे शिवसेना प्रमुख व नगरसेवक सुनील पाटील यांचे तोंडभरून कौतुक केले असून येत्या खोपोली नगर पालिका निवडणूकी दरम्यान त्यांच्यावर नवीन जबाबदारी देऊन नवी उभारी मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
खोपोली येथील समर्थ मंगल कार्यालय येथे शिवसेनेचा कर्जत खालापूर विधानसभा जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार उदय सामंत आले होते या मेळाव्यात त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है ! असे बोलून खोपोलीतील नागरिकांची मन जिंकून मने जिंकून खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला मोठे यश संपादन करण्याच आवाहन खोपोलीतील जनतेला देऊन त्यांचे मन जिंकत सुनील पाटील यांच्या नेतृत्वात येणाऱ्या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी मिळण्याची संधी नाकरता येत नाही, सुनील पाटील खोपोली शहराचे शहर प्रमुख असून ते विद्यमान नगरसेवक देखील आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली खोपोली येथे हा मेळावा मोठ्या संख्येने पार पडला.
काही दिवस महिन्यावर येऊन ठेपलेल्या खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना स्वतंत्रपणे लढणार असून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश आमदार महेंद्र थोरवे यांनी दिले आहे. खोपोली येथे झालेल्या मेळाव्यात इतर पक्षातील मान्यवरांनी व कार्यकर्त्यांनी सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेश केला ह्यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सुनील पाटील यांचे तोंड भरुन कौतुक केले येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत सुनील पाटील यांना मोठी जबाबदारी मिळण्याची संधी नाकारता येत नाही.








Be First to Comment