सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन , मोहोपाडा रसायनी शाखेतर्फे शनिवार दिनांक २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता संविधानदिन व ज्योतिबा फुले स्मृतीदिनानिमित्त स्त्री मुक्ती संघटनेच्या वृषाली मगदूम यांचे ज्योतिबांचं कार्य व संविधानिक मूल्य या विषयावर व्याख्यान जनता विद्यालय, मोहोपाडा येथे आयोजित करण्यात आले आहे. या निमित्ताने पनवेल शाखेच्या कार्यकर्ते रिंगण नाट्य सादर करणार आहेत.
या कार्यक्रमाच्या संपर्कासाठी आरती नाईक (8652223803), प्राजक्ता कवळे (9326028321) आणि प्राची शेळके (8087832269) यांच्याशी संपर्क साधावा , असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते रोहिदास कवळे, महेंद्र नाईक , राजन ताटे यांनी केले आहे.







Be First to Comment