सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
माजी उपसभापती गजानन मांडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज तळेगाववाडी राजिप शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळाल्याने समाधान दिसून आले.कोरोनाचा अधिक धोका वाढल्याने गेल्या वीस महिने शाळा बंदच होत्या.कोरोनाचा धोका कमी झाल्याने नियमांचे पालन करीत शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांनी वर्गात धडे गिरवायला सुरुवात केली आहे.यातच माजी उपसभापती गजानन मांडे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वह्या व इतर शैक्षणिक साहित्य मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण दिसून आले.








Be First to Comment