सिटी बेल | खालापूर | मनोज कळमकर |
नगरपंचायत खालापूर सार्वत्रिक निवडणूक 2021 मतदार यादी चा कार्यक्रम जाहीर झाला आहे. प्रभाग निहाय मतदार यादी 23 नोव्हेंबरला प्रसिद्ध झाली असून त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी 23 ते 26 नोव्हेंबर कालावधी देण्यात आला आहे.
29 नोव्हेंबरला प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मतदान केंद्रांची यादी आणि मतदान केंद्र निहाय मतदार यादी 30 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे. प्रभाग नियाह मतदार याद्या नगरपंचायत खालापूर येथे उपलब्ध करण्यात आल्या असून नागरिकांच्या हरकती व सूचना असल्यास कार्यालयीन वेळेत दाखल करावे असे आवाहन मुख्याधिकारी रश्मी चव्हाण यांनी केले आहे.








Be First to Comment