सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |
मानवी मृत्यू च्या नंतर चे चिरस्थांन म्हणजे स्मशान भूमी मात्र या कडे सरासपणे दुर्लक्ष केले जात असते.पावसाळ्यात सर्वत्र ठिकाणी गवत वाढून सुकून गेले होते. त्याचबरोबर या स्मशानभूमीच्या सभोवताली झाडी झुडपी तसेच कचरा पडले होते. पाताळगंगा नदिच्या ठिकाणी असलेली माजगांव येथिल स्मशानभूमीची येथिल तरुण वर्ग,ग्रामस्थांकडून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.हा परिसर स्वच्छ केला.

स्मशानभूमी स्वच्छता अभियान हा उपक्रम तरुण वर्गांनी हाती घेण्यात आला. यावेळी या ठिकाणी असलेली पायरीची दुरावस्था निर्माण झाल्यामुळे ती बांधण्यात आली.या स्मशानभूमीच्या सभोवतालचा परिसर स्वच्छ करण्यासाठी माजगांवातील तरुण वर्गांचे हात पुढे सरसावत होते.हातात झाडू,घमेले, खुरपणे फावडे असे विविध साहित्य हातात घेवून स्वच्छता करण्यास मग्न झाले होते.हातात झाडू आणी मुखात नामस्मरण करीत स्मशानभुमी स्वच्छ होत असल्यांचे अनेक जण पाहत होते.
तरुण वर्ग एकत्र आल्यास गावाचा विकास होत असतोच, त्याच बरोबर,गावाचे गावपण टिकून राहते. कोणत्याही प्रकारची आशा मनात न बाळगता ही स्वच्छता मोहीम या ठिकाणी राबविण्यात आली.
यावेळी या मोहीमेस कार्यक्रते,ग्रामस्थ,तरुण वर्गांचा समावेश असल्याचे पहावयास मिळाले.








Be First to Comment