Press "Enter" to skip to content

तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे महाडमध्ये मोफत कर्करोग तपासणी शिबीर

सिटी बेल | महाड |

तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेण्टरच्या वतीने तसेच ग्रामीण प्रगती फाऊंडेशन व महाड येथील चैतन्य सेवा संस्थेच्या सहकार्याने नुकतेच महाडमध्ये विनामूल्य कर्करोगपूर्व तपासणी शिबीर करण्यात आले. हे शिबीर महाडमधील भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर राष्टीय स्मारक येथे आयोजीत केले होते. यावेळी महाड तालुक्यातील १२० नागरिकांची तपासणी करण्यात आली विशेष म्हणजे या शिबिरात ७० महिलांनी सहभाग घेतला होता.

या शिबिरात स्तनाचा ,तोंडाचा व गर्भपिशवीचा कर्करोग तपासणीसाठी महत्वाच्या पूर्वतपासणी करण्यात आल्या यामध्ये पॅपस्मेअर तसेच इतर महत्वाच्या तपासण्या करण्यात आल्या. तेरणा डेंटल कॉलेजतर्फे सहभागी नागरिकांना तोंडाचे आरोग्य कसे राखावे यावर मार्गदर्शन केले. बदलती आहार पद्धती तसेच धावत्या जीवनशैलीमुळे विविध कर्करोगाचे प्रमाण वाढत आहेत. कर्करोग म्हणजे मृत्यू असे समीकरण समाजामध्ये रूढ झाले असले तरी कर्करोगाचे निदान जर लवकर झाले तर कर्करोग पूर्णपणे बरा होतो. यासाठी आम्ही हे अभियान सुरु केले आहे. तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेण्टरमध्ये कर्करोगावर अत्याधुनिक पद्धतीचे उपचार उपलब्ध असून ठाणे, नवी मुंबई रायगड-रत्नागिरी येथील अनेक रुग्ण कर्करोगावर उपचार घेत आहेत अशी माहिती तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलचे डेप्युटी जनरल मॅनेजर श्री संतोष साइल यांनी दिली.

या शिबिराला ग्रामीण प्रगती फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अमरेंद्र साडू, सीइओ मंगेश डफळे, चैतन्य सेवा संस्थेचे अध्यक्ष चेतन उतेकर व तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर व तेरणा डेंटल कॉलेजमधील प्रोफेसर, डॉक्टर व पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांचा सहभाग लाभला होता.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.