Press "Enter" to skip to content

बास्केटबॉल असोसिएशन ऑफ रायगडच्या वतीने १८ वर्षाखालील मुले यांच्या जिल्हा निवड चाचणीचे आयोजन

सिटी बेल | पनवेल |

बास्केटबॉल असोसिएशन ऑफ रायगड च्या वतीने १८ वर्षाखालील मुले यांच्या जिल्हा निवड़ चाचणीचे आयोजन रविवार दि.२८ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वा. महात्मा स्कूल मैदान , खांदा कॉलोनी , नवीन पनवेल येथे करण्यात येत आहे .

या निवड चाचणीतून निवडलेला संघ दिनांक १२ डिसेंबर ते १५ डिसेंबर २०२१ रोजी औरंगाबाद येथे होत असलेल्या १८ वर्षाखालील मुलांच्या राज्यस्तरीय स्पर्धेत रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करेल.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी आपले दोन पासपोर्ट साईज फोटो , वयाचा पुरावा आणि रहिवाशी पुरावा सोबत घेऊन यावेत. उशिरा आलेल्या खेळाडूंना प्रवेश मिळणार नाही.तरी सर्व १८ वर्षखालील बास्केटबॉल खिळाडूंनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन असोसिएशन चे अध्यक्ष तथा पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटिल यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क

नईम चिकटे (सचिव) :- 9773913434
विवेक गोरे :- 8169657919
आशिष पाटणे :- 9029596880
आकाश चाकणे :- 9029596949

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.