सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |
रायगड पोलीस दलात कार्यरत असणारे पोलीस हवालदार सचिन भास्कर खैरनार उर्फ भाया यांचा सत्कार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते दिवेआगर येथे करण्यात आले आहे.
आठ वर्षांपूर्वी श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथे दोन सुरक्षा रक्षक यांची हत्या करून दरोडा टाकण्यात आला होता. त्यांनी या दरोडा प्रकरणातील दरोडा प्रकरणातील आरोपी यांना पकडून त्यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आज दिनांक 23 नोव्हेंबर2021 रोजी अंगारकी चतुर्थी निमित्त सुवर्ण गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
या प्रकरणात सचिन खैरनार यांनी मोलाचे कार्य बजावले होते.त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत सत्कार करण्यात आला. सदर प्रसंगी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते पोलीस हवालदार सचिन खैरनार उर्फ भाया यांचा सत्कार करण्यात आला.याबाबत त्यांचे पोलीस दलातील सहकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.








Be First to Comment