सिटी बेल | उरण | घनःश्याम कडू |
न्हावे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जितेंद्र दामोदर म्हात्रे यांची सुकन्या चि.सौ.का.अस्मिता ( राणु )हिचा शुभ विवाह गव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते अजय जनार्दन भगत यांचे चि.अनुप ( पिंटू ) यांच्या बरोबर शाही थाटामाटात संपन्न झाला. यावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून वधूवरांना शुभाशीर्वाद दिले.

यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी मंत्री तथा आमदार गणेश नाईक, भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी आमदार मनोहरशेठ भोईर, उद्योजक तथा माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, सुप्रसिद्ध गायक आंनद शिंदे, जगदीश पाटील, वाय. टी. देशमुख, दिनेश पाटील, मेघनाथ तांडेल, जे. डी. तांडेल, रविशेठ पाटील, आर. सी. घरत, उद्योजक सुनील म्हसकर, माजी सभापती काशिनाथ पाटील, उद्योजक मधुकर पाटील, तालुका प्रमुख संतोष ठाकूर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत घरत,अरुणशेठ भगत, रायगड जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत, नगरसेवक अनिल भगत, पनवेल पंचायत समितीच्या सदस्या सौ रत्नप्रभा घरत सह विविध पक्षांचे पदाधिकारी, पत्रकार, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी,आजी माजी सरपंच, उपसरपंच, ओएनजीसी प्रकल्पातील अधिकारी, ग्रामस्थांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वधूवरास शुभाशीर्वाद दिले. विवाह प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे वधुपिता माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.








Be First to Comment