सिटी बेल | उरण | वैशाली कडू |
वनवासी कल्याण आश्रम ही संस्था पूर्ण भारत भर जनजाती बांधवांच्या हितरक्षणासाठी काम करीत आहे. नुकताच केंद्रसरकारने वनवासी कल्याण आश्रमाच्या विनंती नुसार क्रांती सूर्य बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस हा जनजाती गौरव दिन म्हणून जाहीर केला. यावेळी बैठक होऊन वनवासी कल्याण आश्रम उरण अध्यक्षपदी मनोज ठाकूर यांनी सलग ५ व्यांदा निवड करण्यात आली.
वनवासी कल्याण आश्रम उरण तालुक्याची बैठक झाली. त्यात कुलाबा जिल्हा सचिव रवींद्र पाटील यांनी (2021 ते 2023पर्यंत ) नवीन कार्यकारिणी जाहीर केली.सलग पाचव्यांदा उरण तालुका अध्यक्षपदी मनोज ठाकूर यांची नियुक्ती करीत पुढील कार्यकारणी जाहीर केली.
त्यामध्ये उपाध्यक्षपदी अजित भिंडे, सचिवपदी विश्वनाथ नाईक, सहसचिव कुणाल शिसोदिया, खजिनदार दीपक गोरे, श्रद्धा जागरण प्रमुख विश्वास मोकल,शिक्षण आयाम प्रमुख सुनील वाघमारे, सदस्य वामन म्हात्रे, रमेश फोफेरकर, पारधी,
अंशकालीन सौ सुनंदा वाघमारे, सौ बेबीताई कातकरी, जिल्हा हितरक्षा प्रमुख सौ मीराताई पाटील.








Be First to Comment