Press "Enter" to skip to content

शिवणकाम पुर्ण करणा-या महिलांना प्रमाणपत्राचे वितरण

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

पेहचान प्रोजेक्ट इंडेमित्सु ल्युब प्रा. ली. व येरळा प्रोजेक्ट्स सोसायटी सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील अतिरिक्त एमआयडीसीतील जांभिवली येथे टेलरिंग प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी शिवणकाम प्रमाणपत्राचे वाटप सरपंच रिया कोंडीलकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्या जान्हवी कोंडिलकर व प्रार्थंना देशमुख व पुनम कोडिलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमाबाबत देवदास झेंडे सर यांनी टेलरिंग या व्यवसायातून महिलांनी आपल्या जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली.याकरिता पेहचान प्रोजेक्ट व इंडेमित्सू व येरळा प्रोजेक्ट्स सोसायटी काम करीत आहे. जांभिवलीतील सर्व महीलांनी शिवणकामाचे चांगले शिक्षण घेतले आहे.त्याचा चांगला वापर करून घ्यावा असे आवाहन झेंडे यांनी केले.

कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन व सूत्र संचालनाचे काम ज्योस्ना देशमुख यांनी पाहिले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देवदास झेंडे यांनी अथक परिश्रम घेतले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.