चित्रकला,निबंध स्पर्धेमध्ये यश संपादन केलेल्या मुलांना बक्षीस वाटप
सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |
पोलीसांचे काम समाज्यासाठी अतिषय महत्वाचे असून, कायदा आणी सुव्यवस्था राखण्यासाठी खालापूर पोलीस ठाणे करीत आहे.विद्यार्थ्यांच्या मध्ये असलेली कला सातत्याने द्विगुणित व्हावी यासाठी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेचे आयोजन पोलीस स्मृतिदिनां निमित्ताने करण्यात आले होते.( कोरोना योद्धा पोलीस ) या विषयावर निबंध,चित्रकला स्पर्धेचे आयोजन स्वामी विवेकानंद विद्यामंदिर खालापूर करण्यात आले होते.

यावेळी ५५ विद्यार्थीनी सहभाग घेतला नुकताच या स्पर्धेचा निकाल जाहिर करण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांना खालापूर पोलीस ठाणेचे निरीक्षक अनिल विभुते यांच्या हस्ते चषक बक्षिसे,आणी प्रशस्तीपत्रे देवून गौरवण्यात आले.

”सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’’ हे महाराष्ट्र पोलीसांचे ब्रीदवाक्य असून महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवण्यास कटीबध्द असतात.यामुळे समाज्यात एक्यता टिकून राहते.कर्तव्य बजावत असतांना आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांच्या त्यांच्या स्मरणार्थ २१ ऑक्टोबर पोलीस स्मृतिदिनांचे औचित्य साधून रायगड जिल्हा पोलीस दल अंतर्गत खालापूर ठाणे यांच्या माध्यमातून २७ ऑक्टोबर रोजी ( कोरोना योद्धा पोलीस ) या विषयावर निबंध,चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.सर्व विद्यार्थ्यांनी उत्तम निबंध आणी चित्रे काढण्यात आली.होती.यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

नुकताच हा निकाल जाहिर करण्यात आला.यावेळी चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक- हर्ष संजय जाधव, आंबिवली,द्वितीय – कणक जगदीश मरागजे- वडवळ, तृतीय – काव्य महेश पिंगळे – कांढरोली तसेच – निंबध स्पर्धेत – प्रथम – अन्विता राम लभडे,द्वितीय – तेजस्विनी आप्पासाहेब शिरतोडे,तृतीय – प्रसन्न प्रशांत गोडसे अदि. विद्यार्थ्यांनी या स्पर्धेचे मानकरी ठरले.यावेळी त्यांस बक्षिसे,आणी प्रशस्तीपत्रे देवून गौरवण्यात आले.










Be First to Comment