Press "Enter" to skip to content

जिल्हाधिकारी कार्यालय येथे महत्वाची बैठक

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची दि.22 नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालय येथे महत्वाची बैठक

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग.दि.कुलथे रायगडच्या अधिकाऱ्यांना करणार विशेष मार्गदर्शन

सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |

शासकीय राजपत्रित वर्ग 1 व 2 च्या अधिकाऱ्यांच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ मोलाची भूमिका बजावत असतो. शासन आणि राज्यभरातील सर्व राजपत्रित अधिकारी यांच्यातील अनेक महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी, धोरणात्मक निर्णय राबविण्यासाठी आपापसातील समन्वयाच्या दृष्टीने या संघटनेचे योगदान निश्चितच खूप मोठे आहे.

या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयातील राजपत्रित वर्ग 1 व 2 च्या अधिकाऱ्यांची ओळख तसेच महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाच्या जिल्हा समन्वय समितीचे पुनर्गठन या संदर्भातील महत्वाची बैठक सोमवार, दि. 22 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 4.00 वाजता राजस्व सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीत जिल्ह्यातील राजपत्रित वर्ग 1 व 2 च्या अधिकाऱ्यांना राजपत्रित अधिकाऱ्यांच्या समस्या, शासकीय धोरणे, राजपत्रित अधिकाऱ्यांविषयी घेण्यात आलेले विविध निर्णय, संघटनेची पुढील वाटचाल, राज्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या विविध मागण्या, शासनाशी यशस्वी चर्चा करून आतापर्यंत घेण्यात आलेले विविध सकारात्मक निर्णय, महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ कल्याण केंद्र इमारत, लोकाभिमुख व पारदर्शक प्रशासन राबविण्यासाठी राजपत्रित अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या व कर्तव्ये, जिल्हा समन्वय समितीचे पुनर्गठन अशा विविध विषयांवरील अद्ययावत माहिती देण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार K.ग. दि.कुलथे, मुख्यालय सह सरचिटणीस सुदाम टाव्हरे, संघटक .लरमेश जंजाळ, श्री.बापूसाहेब सोनवणे यांची विशेष उपस्थिती असणार आहे..

तरी जिल्ह्यातील सर्व राजपत्रित वर्ग 1 व 2 च्या अधिकाऱ्यांनी या बैठकीसाठी कोविड प्रतिबंधक उपायांचे (मास्क लावणे, सॅनिटायझर चा वापर इत्यादी नियमांचे पालन करीत मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, जिल्हा कोषागार अधिकारी .मनोजकुमार शेट्ये, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप आणि इतर राजपत्रित अधिकाऱ्यांनी केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.