Press "Enter" to skip to content

उल्हास नदीच्या गणेश विसर्जन घाटावर “उल्हास दीपोत्सव” साजरा

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

त्रिपुरी पौर्णिमेचे औचित्य साधून उल्हास नदी निर्मल जल अभियान यांनी उल्हास नदीच्या गणेश विसर्जन घाटावर उल्हास दीपोत्सव आयोजित केला होता.

नदी ही जीवनदायिनी आहे, ती स्वच्छ ठेवली पाहिजे, त्या नैसर्गिक जलस्त्रोताचे संरक्षण करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे आणि त्याच कर्तव्याची जाणीव नागरिकांना करून देण्यासाठी उल्हास दीपोत्सव आयोजित केला आणि हे दुसरे वर्ष आहे असे उल्हास नदी निर्मल जल अभियानाचे समीर सोहोनी यांनी सांगितले.1500 हुन अधिक दीप समस्त कर्जतकरांनी उल्हास नदीकिनारी प्रज्वलित केले.

ह्या दीपोत्सवास कर्जत नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, पाणी पुरवठा सभापती राहुल डाळिंबकर यांनी उपस्थिती दर्शवली.भारतीय संस्कृती चा अभ्यास करण्यासाठी भारतात आलेले फ्रान्स चे नागरिक क्युंटन काऊडर्ट (पॅरिस) हे सुद्धा दीपोत्सवास उपस्थित होते. त्यांनी उल्हास नदी निर्मल अभियानाचे समीर सोहोनी आणि मुकुंद भागवत यांच्या उपक्रमाचे विशेष कोतुक केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.