अलिबाग मुरुड मेडिकल असोसिएशन , जंजिरा मेडिकल असोसिएशन व जय श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे मुरुडमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन
सिटी बेल | मुरुड-जंजिरा | अमूलकुमार जैन |
मानवी रक्ताला कोणताही पर्याय नाही आणि ते कृत्रिमरीत्या तयार होत नाही तसेच रक्त अधिक काळ साठवून ठेवता येत नाही, आताच्या काळात आजारपण, विविध विषाणू संसर्ग ,अपघात यांचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे सर्वच रक्त पेढ्यांमध्ये रक्त मुबलक असणे गरजेचे आहे , रुग्ण सेवेवर विपरीत होऊ नये म्हणून काळाची गरज ओळखून अलिबाग मुरुड मेडिकल असोसिएशन , जंजिरा मेडिकल असोसिएशन व जय श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे ब्लड बँक सिव्हिल हॉस्पिटल अलिबाग यांच्या सौजन्याने मुरुड मधील कल्याणी हॉस्पिटल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सदर शिबिराचे उदघाटन अलिबाग मुरुड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मयूर कल्याणी व जय श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ऍड. मोहन तांबडकर त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून व डॉ. मकबूल कोकाटे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले, मुरुड मधील सुमारे १७० रक्तदात्यांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान केले असून यामध्ये १८ महिलांचाही समावेश आहे.

रक्तदान केल्यामुळे रक्तातील पेशी वाढण्याची सवय रक्ताला लागते तसेच रक्तदान केलेले रक्त केवळ २४ तास ते सात दिवसात नैसर्गिकरित्या भरून येते व त्यामुळे अशक्तपणाही येत नाही , सत्कार्याला शक्तीची नव्हे तर माणुसकीची गरज आहे म्हणूनच रक्तदान करा असे आवाहन अलिबाग मुरुड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मयूर कल्याणी यांनी केले या प्रसंगी जय श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ऍड मोहन तांबडकर, उपाध्यक्ष दिलीप जोशी, कोषाध्यक्ष प्रकाश पंड्या, व्यवस्थापक संजय ठाकूर , अलिबाग ब्लड बँक प्रमुख डॉ दिलीप गोसावी , जंजिरा मेडिकल असोसिएशनचे डॉ. राज कल्याणी, डॉ अमित बेनकर, डॉ. संजय पाटील , डॉ. मकबूल कोकाटे इत्यादी उपस्थित होते.








Be First to Comment