Press "Enter" to skip to content

रायगड काँग्रेस कमिटीतर्फे किसान विजय दिवस साजरा

रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत यांची पत्रकार परिषद

सिटी बेल| उरण | वैशाली कडू |

केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने काल शेतकऱ्यांच्या विरोधातील तीन काळे कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला. हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा व खासदार  राहुल गांधी  यांच्या नेतृत्वाखाली एकजूट होऊन केंद्रातील विरोधी पक्षाने दिलेल्या लढ्याचा ऐतिहासिक विजय आहे. यानिमित्ताने रायगड काँग्रेस कमिटीतर्फे  उरण काँग्रेस भवनमध्ये किसान विजय दिवस साजरा करण्यात आला.    

हा देशातील सर्व अन्नदात्यांचा विजय असुन त्यांनी केलेल्या वर्षभर त्यागाचा विजय आहे. केंद्रातील अहंकारी सरकारला झुकवून हे तिन्ही काळे कायदे मागे घेण्यास शेतकऱ्यांनी भाग पाडले असल्याचे
रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष  महेंद्र घरत  यांनी आज सकाळी उरण काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषद घेऊन सांगितले. यावेळी रा. जि.म.कॉ.उपाध्यक्षा सौ.संध्या ठाकूर, मिलिंद पाडगावकर उपस्थित होते.      

सर्वप्रथम देशातील तीन काळे कृषी कायदे रद्द होण्यासाठी ज्या 700 शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले त्या शहिद शेतकऱ्यांना सर्वप्रथम श्रद्धांजली वाहण्यात आली.त्यानंतर पत्रकारांना संबोधित करताना रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांनी सांगितलं कि देशातील शेतकऱ्यांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष व पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी, प्रियांका गांधी हे नेहमीच राहिले अग्रेसर आहेत. त्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा सुरूच ठेवला होता असे जिल्हाध्यक्ष घरत यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.