जय महाराष्ट्र शिक्षक व कर्मचारी सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदी नरेश मोकाशी यांची निवड
सिटी बेल | जेएनपीटी | वार्ताहर |
शिक्षकांच्या समस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी धडपडणारे शिक्षक नेते तथा सामाजिक कार्यात हिरीरीने सहभाग घेणारे नरेश मोकाशी ( गुरुजी ) यांच्या कार्याची दखल जय महाराष्ट्र शिक्षक व कर्मचारी सेनेचे राज्य अध्यक्ष विजय पाटील यांनी घेऊन नरेश मोकाशी (गुरुजी) यांची जय महाराष्ट्र शिक्षक व कर्मचारी सेनेच्या रायगड जिल्हाध्यक्ष पदी निवड केल्याचे नियुक्त पत्र दिले. जय महाराष्ट्र शिक्षक व कर्मचारी सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदी नरेश मोकाशी यांची निवड होताच त्यांचे अभिनंदन माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांनी केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

जय महाराष्ट्र शिक्षक व कर्मचारी सेना हि राज्यातील शिक्षक व कर्मचारी यांच्या समस्यांना शासनस्तरावर न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे.अशा जय महाराष्ट्र शिक्षक व कर्मचारी सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदी नरेश मोकाशी ( गुरुजी) यांची निवड होताच शिवसेनेचे खासदार संजय राऊत व त्यांचे बंधु तथा आमदार सुनील राऊत, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस व माजी मंत्री सचिन अहिर, सेनेचे सरचिटणीस संदिप परब, सेनेचे खजिनदार रामदास हंजनकर, रायगड जिल्हा उपप्रमुख नरेश रहालकर,उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर,तालुका संघटक बी.एन.डाकी,रायगड जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, सामाजिक कार्यकर्ता लाखन पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

तसेच जय महाराष्ट्र शिक्षक व कर्मचारी सेनेच्या रायगड जिल्हा कार्यकारिणी पदी जिल्हा संपर्क प्रमुख पदी निर्भय म्हात्रे, जिल्हा सरचिटणीस पदी बबन पाटील, जिल्हा उपाध्यक्ष पदी रमणीक म्हात्रे, खजिनदार पदी के आर म्हात्रे, सल्लागार पदी हि.सो म्हात्रे,बी.जे.म्हात्रे,उरण तालुकाध्यक्ष पदी बळीराम पाटील यांची निवड करण्यात आल्याने नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन जय महाराष्ट्र शिक्षक व कर्मचारी सेनेचे राज्य अध्यक्ष विजय पाटील, आमदार सुनील राऊत व माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांनी अभिनंदन केले आहे.








Be First to Comment