Press "Enter" to skip to content

एस.टी.च्या विलिनीकरणाला पाठिंब्याचे पत्र

आझाद हिंद शेतकरी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे खासगीकरण रद्द करून सरकारी विलीनीकरण करण्यासाठी आझाद हिंद शेतकरी संघटनेने पाठिंबा दर्शविला असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांना एस.टी.च्या विलिनीकरणाला पाठिंब्याचे पत्र महाड तहसिलदार सुरेश काशिद यांच्यामार्फत पाठविण्यात आले आहे. यानंतर महाड एस.टी.आगारातील आंदोलनकर्त्या एस.टी.कर्मचाऱ्यांना आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेटून पाठिंबा दर्शविला.

आझाद हिंद शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ऍड.सतीशचंद्र रोठे पाटील व कोकण प्रदेश अध्यक्ष काळूराम आर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महिला अध्यक्षा अस्मिता भूषण देवळेकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर झांजे, महाड पोलादपूर तालुका अध्यक्ष संजय आंबावले, महाड तालुका अध्यक्ष बापू डोंबे, महाड तालुका कामगार अध्यक्ष संतोष चव्हाण, महाड तालुका उपाध्यक्ष विजय चाळके, उज्ज्वला गायकवाड, हरिश्चंद्र उंदरे, बाळकृष्ण वाडकर, रामचंद्र मोरे, संदीप कदम, बबन बटावले, विद्याधर हेले, एकनाथ सुतार, दत्ताराम मोरे आदींनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे खासगीकरण रद्द करून सरकारी विलीनीकरण करण्यासंदर्भातील आंदोलनाला पाठिंबा असल्याचे पत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांना महाड तहसिलदार सुरेश काशिद यांच्यामार्फत पाठविण्यासाठी दिले. यानंतर महाड येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आगारामध्ये सुरू असलेल्या आंदोलनस्थळी जाऊन आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाला आझाद हिंद शेतकरी संघटनेचा पाठिंबा असल्याचे निवेदन देऊन पाठिंबा दर्शविला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.