इंदिराजींमुळेच आपण इथ पर्यंत मजल मारली — सुभाष मदन
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
‘भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी आपल्या काळात भारत कसा आत्मनिर्भय होईल. याकडे विशेष लक्ष दिले. बँकांचे राष्ट्रीयीकरण, विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण हे त्यांचे देणे आहे. त्यांनी त्याकाळात केलेली अणूचाचणी सुद्धा एक विशेष उल्लेखनीय बाब होती. इंदिराजींमुळेच आपण इथं पर्यंत मजल मारली.’ असे महत्वपूर्ण प्रतिपादन काँग्रेसचे सुभाष मदन यांनी येथे केले.
इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त कर्जत तालुका काँग्रेसच्या वतीने आमराई मधील आशीर्वाद सभागृहात अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. माजी शहराध्यक्ष विजय हरिश्चंद्रे यांच्या हस्ते इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर इंदिराजींना उपस्थितांनी अभिवादन केले. यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष मुकेश सुर्वे यांनी प्रस्ताविकात, ‘इंदिरा गांधी यांनी आपल्या कारकिर्दीत विरोध असतानाही अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. त्यामुळे शेतकरी, नोकरदार व सर्वसामान्यांची सर्वच प्रकारची उन्नती झाली. असे व्यक्तिमत्त्व आधी नव्हते व यापुढेही होणार नाही.’ असे सांगितले. विजय हरिश्चंद्रे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष संजय सुर्वे, संदीप पाटील आदी उपस्थित होते.








Be First to Comment