सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |
बदलत्या युगात माणूस बदलत चालाल असला,तरी सुद्धा भारतीय संस्कृती ग्रामीण भागात जोपासली जात आहे.यामुळेच हिंदू संस्कृतीत तुलसी विवाहसोहळ्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान पहावयास मिळत आहे.तुलसी विवाह झाला की लग्नाचा शुभ मुहूर्त काढत असतात.तसेच दिवाळी या सणाची सांगता होत असते.तुलसी विवाह झाल्याशिवाय घरातील शुभविवाह न करण्याची प्रथा आजही पाळली जाते.
कार्तिक शुद्धएकादशी ते पौर्णिमा या कालावधीत हा विवाहचा असल्यामुळे या विवाहानंतर चातुर्मासाची समाप्ती होते असते.यामुळे वधू-वरांच्या विवाहाच्या सगळ्या तिथी मोकळ्या होत असतात.
ग्रामीण भागात दरवर्षी तुलसी विवाहाला अंगण तयार करून लालमातीने सारवले जाते.पुरोहित अथवा गावातील नागरिक मंगलाष्टक म्हणत अक्षता टाकून विवाह पार पाडत असतात. तुलसी वृंदावनाची जागा आकर्षक अशी रंगरंगोटी केली जाते.ही कामे ग्रामीण भागात नागरिक आवडीने करुन हा तुलसी विवाह संपन्न करण्यात आले.








Be First to Comment