Press "Enter" to skip to content

पेण खारेपाटातील पाण्यासाठी शेकापची लढाई पुन्हा सुरू

२३ नोव्हेंबर रोजी जीवन प्राधिकरण कार्यालयाला घेराव घालणार – धैर्यशील पाटील

सिटी बेल | पेण | वार्ताहर |

मागच्या अनेक काळापासून पेणचा खारेपाट विभाग पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहिला असल्याने याकरीता पेण तालुक्यातील शेकापक्षाने पाण्यासाठी काढलेल्या मोर्चाअंती शासनाने खारेपाटासाठी जवळपास साधारणपणे ३० कोटी रूपये दिले असून मागचे दोन वर्षे पूर्ण झाले तरी सदर काम पूर्ण होत नसल्याने अखेर खारेपाटाच्या पाण्यासाठी शेकापक्षाने पुन्हा लढाई सुरू करण्याचा निर्धार केला असून येत्या २३ नोव्हेंबर रोजी पेणच्या जीवन प्राधिकरण कार्यालयाला घेराव घालून आंदोलन करण्यात येणार असल्याचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

पेणच्या खारेपाट विभागातील पिण्याच्या पाण्यासाठी मागच्या अनेक वर्षापासून शेकाप लढत असताना याकरीता अनेक आंदोलने, मोर्चे, उपोषण, रास्तारोको यासर्व गोष्टी करीत असताना सन २०१७ रोजी तालुक्यातील नागरिकांसह मोठ्या प्रमाणावर पायी चालत हंडा मोर्चा आंदोलन करण्यात आले त्या आंदोलनाची दखल घेऊन भाजपचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेणच्या खारेपाटाला मोर्चेकऱ्यांच्या समवेत पाण्याच्या प्रश्नाची सोडवणूक करीत २९ कोटी ३८ लाख रुपयांचा धनादेशाचा निधी जीवन प्राधिकरणाकडे सुपुर्त करण्यात आला.

त्यानुसार याचे काम सुरू झाले मात्र यानंतर कोरोना मध्ये सदर काम ठप्प झाले परंतु त्यानंतर दोन वर्षांचा कालावधी उलटून गेला असून यामध्ये ६० ते ७० टक्के काम झाले आहे मात्र यामध्ये काही राजकारण आल्यामुळे पुढचे ३० टक्क्याचे काम अजून पुर्ण होत नाही त्यामुळे सदर योजनेचे काम करण्यासाठी पहिल्यांदा पुर्ण निधी उपलब्ध असतानाही सदर ठेकेदारांनी हे काम का पुर्ण केले नाही याकरीता पुन्हा शेकापक्षाने हे काम हाती घेतले असून याकरीता लागणा-या सर्व मंजू-या आणण्यासाठी मी अतोनात पर्यंत केले आहेत.

त्यामुळे हे काम पुर्ण करण्याची माझीच जबाबदारी पकडून सदर योजनेचे पैसे परत जाऊ नये याकरिता येत्या २३ नोव्हेंबरला जीवन प्राधिकरण कार्यालयाला घेरावा घालून एक वर्षोच्या आत वाशीच्या खारेपाटाला पाणी सोडणार असल्याचे प्राधिकरणाचे सक्षम अधिकारी शब्द देत नाही तोपर्यंत सदर आंदोलन हे सूरूच राहणार असल्याचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी शेवटी पत्रकार परिषदेत सांगितले.या पत्रकार परिषदेला माजी नगराध्यक्ष गुरूनाथ मांजरेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊ ऐरणकर, के.डी.म्हात्रे, तालुका चिटणीस संजय डंगर आदिंसह शेकाप कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.