कॉंग्रेसच्या कल्याण सहप्रभारी पदी पेणचे चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती
सिटी बेल | पेण | वार्ताहर |
येणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली राज्यात पुन्हा कॉंग्रेस पक्षांनी भरारी घेतली असून निवडणुकीच्या अनुषंगाने पेण येथील जेष्ठ काॅग्रेस कार्यकर्ते चंद्रकांत पाटील यांची कल्याणच्या सहप्रभारी म्हणून नुकतीच निवड करण्यात आली आहे.
मागच्या अनेक काळापासून काॅग्रेस पक्षात काम करीत असतांना अनेक पदे त्यांनी भुषविली आहेत. काॅग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असल्यामुळे त्यांना प्रदेश सरचिटणीस हे सुद्धा पद वरिष्ठांकडून सोपविण्यात आले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय ऄ. आर. अंतुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नाना पटोले यांच्या आशिर्वादाने आणि जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळात रायगड जिल्ह्यासह कोकणात पक्ष वाढविण्यासाठी आपण तनमनधनाने काम करणार असून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी करीता आपल्यावर जी जबाबदारी टाकण्यात आली आहे ती योग्य रितीने पेलणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.








Be First to Comment