सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रांतीगृह घाणीच्या विळख्यात : अक्षम्य दुर्लक्षामुळे कर्जत नगरीला बट्टा
सिटी बेल | कर्जत | स्वागता पाटील |
कर्जत शहराच्या प्रवेशद्वाराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या व मुख्य रस्त्याच्या बाजुलाच असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रांतीगृहाच्या आसपास तसेच आतील परिसरात भयंकर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे, त्याचबरोबर जंगली गवताने विश्रांतीगृहावर आक्रमण करून ताबा मिळवला आहे.
परंतु, नेहमीच लेट लतिफ असलेले सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र डोळे उघडे ठेवुन झोपी गेलेले आहे. अशा निद्रिस्त विभागामुळे विश्रामगृहाच्या लगत राहणा-या नागरिकांना, लहान मुलांना ये जा करतेवेळी जंगली श्वापदे, साप, विंचु यांचा धोका निर्माण झाला आहे तसेच मच्छर व घाणीच्या दुर्गंधीचाही सामना करावा लागत आहे. तरी, निद्रिस्त सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने विश्रांतीगृहाची तसेच आसपासच्या परिसराची स्वच्छता करावी. अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती चे कोकण विभागीय अध्यक्ष अमूलकुमार भलगट,दक्षिण जिल्हाध्यक्ष विरेश मोरखडकर यांनी केली आहे.
कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा, मुख्याधिकारी, आजी माजी नगरसेवक, नगरसेविका तसेच स्वच्छता विभाग, स्वच्छता कर्मचारी कर्जत शहराच्या सौंदर्यीकरणासाठी सतत प्रयत्नशील असतात. त्यामुळेच नगरपरिषदेला स्वच्छतेचे अनेक पुरस्कार देखील मिळाले आणि भविष्यातही मिळत राहतील.
माजी मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी अंमलात आणलेल्या कचरा व्यवस्थापनाच्या नियोजनामुळे कर्जत नगरपरिषदेच्या डंपींग ग्राउंडचे देखील सुंदर अशा नंदनवनात रुपांतरण झाले. नगरपरिषदेसह शहरातील सर्व नागरिक स्वच्छतेविषयी जागरुक असताना सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र सुस्तावलेला दिसुन येत आहे.








Be First to Comment