Press "Enter" to skip to content

रुपेश पाटील यांची नियुक्ती

मनसेच्या पेण तालुकाध्यक्षपदी रुपेश पाटील यांची नियुक्ती

सिटी बेल | पेण | वार्ताहर |

पेण तालुक्यातील अन्यायग्रस्त नागरीकांना न्याय मिळवून देण्याची भुमिका बजावणारे तसेच कामगारांच्या हक्कांसाठी वेळप्रसंगी लढा देणारे मनसे कार्यकर्ते रुपेश पाटील यांच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेच्या पेण तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी टाकण्यात आली असून याबाबतचे नियुक्तीपत्र त्यांना नुकतेच देण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अंतर्गत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तसेच नगरपालिकेच्या निवडणुका येत्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असल्याने या नियुक्तीकडे पाहिले जात असल्याने आता तालुक्यात मनसेची घोडदौड वाढणार आहे.या नियुक्ती निमित्ताने बोलतांना रुपेश पाटील यांनी सांगितले की, मागच्या अनेक वर्षापासून मी मनसेचा कार्यकर्ता आहे पक्षांनी माझ्यावर टाकलेली जबाबदारी यशस्वीपणे पेलणार असून तालुक्यात मनसे वाढविण्यासाठी तनमनधनाने काम करणार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.