शेतकऱ्यांचे भात खरेदी झालीच पाहिजे’ भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा आक्रमक
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
कर्जत तालुक्यात शेतकऱ्यांचे भात आज 16 नोव्हेंबर उजाडला तरी खरेदी केले जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे ही बाब लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने आज तहसीलदार कर्जत आणि कर्जत तालुका खरेदी विक्री संघ यांना निवेदन वजा आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
यावेळी भाजपचे कार्यकर्ते आक्रमक होते.
खरे तर शासकीय नियमाप्रमाणे 1ऑक्टोबरला हमी भावाने भात खरेदी केंद्र चालू होणे अपेक्षित आहे परंतु दीड महिना उलटून गेला तरी भात खरेदी केंद्र चालू झालेले नाही. कोरोना काळात संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला त्याचे भात कवडीमोल भावाने विकावे लागत आहे. साधारणता बाराशे ते तेराशे रुपये प्रति क्विंटल दराने भात शेतकरी व्यापाऱ्यांना नाईलाजाने विकत आहेत. तेच भात दलाल आणि व्यापारी हमीभाव केंद्रावर ती आणून खोटेनाटे उतारे जोडून साडे 1960 रुपये प्रति क्विंटल या भावाने विकत असतात. ही निव्वळ शेतकऱ्याची फसवणूक आहे त्यात आडलेला नडलेला शेतकरी होरपळून निघत आहे.
म्हणून या निद्रिस्त शासनाला जाग येणे करता किसान मोर्चाच्या वतीने तहसीलदार आणि खरेदी विक्री संघाला निवेदन देऊन सांगितले आहे की, ‘येत्या दोन दिवसात भटत खरेदी केंद्र चालू न केल्यास किसान मोर्चा रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. त्याचप्रमाणे खरेदी विक्री केंद्रावर कुठलेही व्यवहार होऊन देणार नाही सर्व व्यापारांच्या गोदामाना टाळे लावू.’ असा इशारा किसान मोर्चाच्या वतीने कोकण संपर्क प्रमुख सूनील गोगटे यांनी दिला.
याप्रसंगी किसान मोर्चा तालुका अध्यक्ष शिरीष कदम, चिटणीस भगवान भगवान डोंगरे, दशरथ पोसाटे, नथु कराळे, रमेश आहेर, वामन ऐनकर, मनोहर मणेर, सर्वेश गोगटे, दशरथ मुने आदी उपस्थित होते.
Be First to Comment