Press "Enter" to skip to content

पोलादपुरात महीला राज

पोलादपूर नगरपंचायतीत आरक्षणामध्ये महिला राज : 17 पैकी 9 महिला जागांचे आरक्षण

सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |

पोलादपूर नगरपंचायतीच्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दुसऱ्यावेळी आरक्षण काढण्यात आले असता 17 पैकी 9 महिला राखीव जागांचे आरक्षण निश्चित झाले आहे.

पोलादपूर नगरपंचायतीचे निवडणूक आरक्षण होण्यासाठी स्व.बाळासाहेब ठाकरे सभागृहामध्ये प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्यासह नगरपंचायतीचे मुख्याधिकारी महादेव रोडगे, महादेव सरंबळे, अडसूळ आदी उपस्थित होते. यामध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये सर्वसाधारण महिला, प्रभाग 2 मध्ये नागरिकांचा मागासप्रवर्ग व सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 3 मध्ये अनुसुचित जाती प्रवर्ग, प्रभाग क्रमांक 4 मध्ये सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 5 मध्ये सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 6 मध्ये सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 7मध्ये सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 8मध्ये नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला, प्रभाग क्रमांक 9मध्ये सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 10 मध्ये नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला, प्रभाग क्रमांक 11 मध्ये सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 12 मध्ये मागास प्रवर्ग महिला, प्रभाग क्रमांक 13 मध्ये सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 14 मध्ये नामप्र-सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 15 मध्ये सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 16 मध्ये सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 17 मध्ये सर्वसाधारण असे आरक्षण निश्चित झाले आहे.

या आरक्षणावेळी एकूण 17 जागांमध्ये नामाप्र महिला 2 तर सर्वसाधारण महिलांचे 7 प्रभागांमध्ये आरक्षण दिसून आले आहे. या महिला राज आरक्षणामुळे ज्या प्रभागातून निवडून आलेल्या नगरसेवकांना पुन्हा निवडणूक लढण्याची इच्छा होती त्यांना स्वत:च्या घरातील महिलेला संधी देण्याची भूमिका घ्यावी लागणार आहे. पोलादपूर नगरपंचायतीमध्ये आरक्षण जाहिर झाल्यानंतर आता नगरपंचायतीमध्ये निवडणूक पुर्व युती करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस अनुत्सुक असून महाआघाडीचा प्रयोग करण्याचे झाल्यास भाजपाविरोधात सर्वपक्षिय अशी परिस्थिती होऊ शकणार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.